
6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. “उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. ठाकरे गटात शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच लोक उरतील असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. “अमित शाहांनी सांगितल्याप्रमाणे देशात एकच शिवसेना असेल!”
माध्यमांशी बोलताना आशिष जैस्वाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या विधानाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “अमित शाहा यांनी आधीच स्पष्ट केले होते की, आगामी काळात महाराष्ट्रात एकच शिवसेना असेल आणि ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना. सध्या तेच घडत असून ठाकरे गटाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आमच्या पक्षात येत आहेत. लवकरच संपूर्ण पक्ष एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभा असलेला दिसेल.” शिंदेंचे संख्याबळ 7 वरून 13
कालच संजय दिना पाटील यांच्यासह ६ खासदारांनी अधिकृत प्रवेश केल्यामुळे संसदेत शिंदेंचे संख्याबळ ७ वरून १३ झाले आहे. हा धक्का ताजा असतानाच आशिष जैस्वाल यांनी थेट ९९.९९ टक्के लोक पक्षात येतील असा दावा केला आहे. हे ही वाचा.. घरात घुसून मारू, सुरक्षा ठेवा नाहीतर बॉम्ब टाकेन!: माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल, संजय दिना पाटलांचा ठाकरे गटाला इशारा ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर करत विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. “माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालो. पण जर कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी आधी स्वतःचा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा, कारण माझ्या नादाला लागणारे थेट हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
