देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचे घर लुटले: नागपुरात 64 लाखांच्या मुद्देमालासह 2 चोरट्यांना अटक – Nagpur News

देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचे घर लुटले:  नागपुरात 64 लाखांच्या मुद्देमालासह 2 चोरट्यांना अटक – Nagpur News



नागपूरमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या एका किराणा व्यापाऱ्याच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ६३,९९,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यश उर्फ बाबा संजय बनसोड (वय २५, रा. जरीपटका, नागपूर) आणि अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे (वय २०, रा. घसीयारीपुरा, पाचपावली, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अमित हिरालाल गुप्ता (वय ४९, रा. कपिल नगर) यांचे लष्करीबाग परिसरात किराणा दुकान आहे. १५ जून २०२६ रोजी गुप्ता यांचे लहान भाऊ प्रकाश गुप्ता हे आपल्या कुटुंबासह राजस्थानमधील खाटूश्याम मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी घराच्या मुख्य दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. १८ जून रोजी गुप्ता यांच्या भाडेकरूने घराचे कुलूप तुटल्याचे फोनवरून सांगताच हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पाचपावली पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून संशयितांची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून यश उर्फ बाबा बनसोड आणि अंशुल उर्फ अनुप वाकडे यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून पहिल्या गुन्ह्यातील ५९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींची अधिक चौकशी केली असता, आरोपी अंशुल वाकडे याने १० महिन्यांपूर्वी लष्करीबाग येथीलच वरवरे यांच्या घरी केलेल्या आणखी एका चोरीची कबुली दिली. या दुसऱ्या गुन्ह्यातून पोलिसांनी ४ लाख ८६ हजार ९२० रुपये किमतीची ३४.७८० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (बिस्कीट) जप्त केली आहे. अशाप्रकारे दोन्ही गुन्ह्यांमधून एकूण सुमारे ६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp