नेरपिंगळाईत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू: दुसरा शेतकरी गंभीर जखमी, अमरावती रुग्णालयात दाखल – Amravati News

नेरपिंगळाईत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू:  दुसरा शेतकरी गंभीर जखमी, अमरावती रुग्णालयात दाखल – Amravati News



नेरपिंगळाई परिसरात रविवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून अशोक जगजीवनराम भोजने (वय ६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी अनुप वासुदेव कोकाटे (वय ३२) गंभीर जखमी झाले. ही घटना धानोरा शेतशिवारात घडली. अशोक भोजने आणि अनुप कोकाटे हे दोघेही कापूस पेरणीच्या कामासाठी शेतात गेले होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याने त्यांना पुढील काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते काम आटोपून घरी परतण्याच्या तयारीत असतानाच अचानक वीज कोसळली. या विजेच्या तडाख्यात भोजने यांचा जागीच मृत्यू झाला, तर कोकाटे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी कोकाटे यांना उपचारासाठी अमरावती येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शिरखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मृत अशोक भोजने यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे शासनाने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच जखमी अनुप कोकाटे यांच्या उपचाराचा खर्चही शासनाने उचलावा, अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात शेतीची कामे करताना हवामानातील बदल लक्षात घेऊन विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp