
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हत्ती आणि मानवामधील संघर्ष अत्यंत तीव्र आणि चिंताजनक बनला आहे. रानटी हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत चार निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून, या गंभीर मुद्द्यावर आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घटना थांबवण्यासाठी वन विभागाने केवळ जुन्या पद्धती न वापरता तातडीने ‘विशेष टास्क फोर्स’ स्थापन करावी, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्षांनीही सरकारला तातडीने निवेदन करण्याचे निर्देश दिले आहेत. हत्तीने पाठलाग करून तरुणाला चिरडले! विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात २ जुलै रोजी घडलेली एक अत्यंत वेदनादायी घटना निदर्शनास आणून दिली. त्यांच्याच मतदारसंघात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात, व्याहाड सोनापूर मार्गावर अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. जीव वाचवण्यासाठी अतुलने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने त्याचा पाठलाग करून त्याला जागीच चिरडले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. ३२ हत्तींचा कळप; वन विभागाचा ‘खो-खो’चा खेळ सध्या ३० ते ३२ रानटी हत्तींचा कळप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहे. हत्तींमुळे शेकडो घरे, झोपड्या आणि शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वडेट्टीवार म्हणाले, “वन विभागाकडून केवळ हत्ती हाकलण्याचे जुजबी प्रयत्न केले जात आहेत. हे हत्ती गडचिरोलीतून हाकलले की चंद्रपूर जिल्ह्यात येतात, आणि चंद्रपुरातून हाकलले की पुन्हा गडचिरोलीत जातात. वन विभागाचा हा खेळ सुरू असून यावर कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा नाही.” खाणकाम आणि जंगलांवरील अतिक्रमणामुळे हत्तींचे पारंपरिक मार्ग बदलल्याने हा संघर्ष वाढल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या प्रमुख मागण्या: अध्यक्षही आक्रमक; सरकारला दिले निर्देश विधानसभा अध्यक्षांनीही या विषयाचे गांभीर्य मान्य केले. “अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही जर आपण हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकत नसू, तर ही गंभीर बाब आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जीव जाणे खपवून घेतले जाणार नाही,” असे सांगत, शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन काय उपाययोजना करणार आहे, याचे निवेदन सभागृहात करावे, असे कडक निर्देश अध्यक्षांनी राज्य सरकारला दिले आहेत. हेही वाचा.. माणसं मेल्यावर सरकार दात काढून निर्लज्जपणे हसतेय:104 टक्के नालेसफाईचा दावा फोल, मुंबई तुंबली अन् कमिशन कोणाचे? संजय राऊतांचा सवाल
मुंबई भाजप अध्यक्षांनी या मृत्यूंची निर्लज्जपणे थट्टा उडवली आहे. ‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील नेत्याची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. सरकारने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळेच या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
