घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर: निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी – Chhatrapati Sambhajinagar News

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:  निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच, वर्ग ३ कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एका मॅरेथॉन बैठकीत हा ९ कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला. ही बैठक पहिल्यांदाच घाटीबाहेर शासकीय कर्करोग रुग्णालयात पार पडली. या निर्णयामुळे निवासी डॉक्टरांना कामाच्या ताणातून मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही विभागाला डॉक्टरांकडून केवळ आठ तास काम करून घेणे बंधनकारक असेल. यासाठी रोटेशन टाइम टेबल एका आठवड्यात अधिष्ठाता कार्यालयात सादर करावे लागणार आहे. याशिवाय, दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी निवासी डॉक्टरांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रुग्णसेवेत दिरंगाई आणि बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. सकाळी १०:३० वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर नसलेल्या डॉक्टरांकडून लेखी खुलासा मागवला जाईल. रुग्णालयाच्या प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी वर्ग-३ कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या आर्थिक तरतुदींनाही मंजुरी देण्यात आली. कर्करोग रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या किरणोपचार (रेडिओथेरपी) विभागातील यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपये, तर वैद्यकीय ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण ७५ लाख रुपयांचा निधी यासाठी वापरला जाईल. रुग्णालयातील वाढता ताण आणि मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, स्थानिक पातळीवर तात्काळ भरता येणारी सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. तसेच, पेट स्कॅन तपासणी सुलभ आणि गतीने व्हावी यासाठी डॉ. दर्पण जक्कल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशीनुसारच आता पेट स्कॅन केले जातील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp