अमरावती जिल्ह्यात पाऊस ८८% वर; ६ तालुक्यांनी ओलांडली सरासरी: चांदूर बाजारमध्ये सर्वाधिक १२०.९%, अचलपुरात ६६.१% पाऊस – Amravati News

अमरावती जिल्ह्यात पाऊस ८८% वर; ६ तालुक्यांनी ओलांडली सरासरी:  चांदूर बाजारमध्ये सर्वाधिक १२०.९%, अचलपुरात ६६.१% पाऊस – Amravati News



अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण असले तरी, १४ पैकी केवळ सहा तालुक्यांनीच सरासरी पावसाची नोंद ओलांडली आहे. जिल्ह्याचा एकूण पाऊस गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ८८.९ टक्क्यांवर आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १२०.९ टक्के पावसाची नोंद झाली असून, अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ६६.१ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण १९३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीनुसार, या काळात सरासरी २१७.३ मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. अल निनो आणि मोसमी वाऱ्यांमधील बदलांमुळे यावर्षी पावसाळा अनियमित राहिला. जून महिन्याचा शेवटचा आठवडा वगळता, उर्वरित दिवस कोरडे होते. या अनियमिततेमुळे आठ तालुके अजूनही सरासरीपासून दूर आहेत. याचा परिणाम पेरणीवरही झाला असून, कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सुमारे २५ टक्के जमीन अजूनही पेरणीविना आहे. ज्या सहा तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे, त्यात चांदूर बाजार तालुका आघाडीवर आहे. येथे गेल्या १० वर्षांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा अधिक, म्हणजेच १२०.९ टक्के (२०२.२ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली. यानंतर दर्यापूर तालुक्यात ११२.९ टक्के, मोर्शी तालुक्यात ११०.९ टक्के, नांदगाव खंडेश्वरमध्ये ११०.६ टक्के आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात ११०.५ टक्के पाऊस झाला आहे. धारणी तालुक्यात १०५.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. याउलट, उर्वरित आठ तालुके अजूनही सरासरी गाठण्यापासून दूर आहेत. अचलपूरमध्ये सर्वात कमी ६६.१ टक्के पाऊस पडला आहे. भातकुळीमध्ये ६६.५ टक्के, धामणगावात ७२ टक्के, चिखलदऱ्यात ७२.३ टक्के, अमरावतीत ७८.९ टक्के, चांदूर रेल्वेत ८४.८ टक्के, तिवसा येथे ८६.२ टक्के तर वरुडमध्ये ९८.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वरुड वगळता इतर तालुक्यांना सरासरी गाठण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वात कमी (६६.१ टक्के) पाऊस अचलपूर तालुक्यात नोंदवला गेला, तर याच विधानसभा मतदारसंघातील चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक (१२०.९ टक्के) पाऊस झाला आहे. एकाच भौगोलिक क्षेत्रात पावसाची ही उच्चांकी आणि नीचांकी स्थिती हवामानतज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार, चांदूर बाजार तालुक्यात २०२.२ मिलीमीटर, तर अचलपूर तालुक्यात १४३.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp