स्वतःचे दागिने, वाडा विकून ‘मिसिंग लिंक’ बांधलाय का?: हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात; भ्रष्टाचारावरून थेट नार्को टेस्टचे आव्हान – Maharashtra News

स्वतःचे दागिने, वाडा विकून ‘मिसिंग लिंक’ बांधलाय का?:  हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात; भ्रष्टाचारावरून थेट नार्को टेस्टचे आव्हान – Maharashtra News



‘मिसिंग लिंक’वरून सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पांवरून टीका झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता यावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर अत्यंत टीका केली आहे. “मिसिंग लिंक मीच बांधला, असा फडणवीसांचा अहंकार आहे; पण त्यांनी स्वतःची शेती किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला नाही,” असा घणाघात सपकाळ यांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस हे ‘इन्फ्रामॅन’ नसून ‘डिझास्टर मॅन’ असल्याची टीका करत, भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी त्यांनी फडणवीसांना थेट ‘नार्को टेस्ट’ करण्याचे खुले आव्हान दिले आहे. ते शुक्रवारी बुलडाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “स्वतःचे दागिने विकून प्रकल्प बांधलाय का?” हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी-पणा’वर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने आणि गळती लागल्याने राज्याची बदनामी झाली आहे. नागरिकही रोष व्यक्त करत आहेत. पण, देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की ‘मिसिंग लिंक मी बांधला’. अहो, तुम्ही तुमची स्वतःची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला नाही. हा जनतेच्या पैशातून उभा राहिलेला प्रकल्प आहे. त्यामुळे एवढा अहंकार योग्य नाही. त्यांच्या या भूमिकेतून सर्वसामान्य जनतेचा अपमान होत आहे.” विशिष्ट विचारधारेचा अहंकार; ‘आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध’ फडणवीसांच्या मानसिकतेवर प्रहार करताना सपकाळ म्हणाले की, “मी जेव्हा मिसिंग लिंकबाबत टीका केली, तेव्हा ‘ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्याच्यावर काय बोलायचे’, असे उत्तर फडणवीसांनी दिले. त्यांची ही भाषा त्यांची मानसिकता आणि अहंकार दर्शवणारी आहे. देवेंद्र फडणवीस ज्या विशिष्ट विचारांच्या पठडीतून आले आहेत, तिथे ‘सगळं ज्ञान फक्त आमच्याकडेच आहे आणि आम्ही सोडून बाकी सगळे निर्बुद्ध आहेत’, अशीच धारणा असते. दहा वर्षांनी विरोधक शिल्लक राहणार नाहीत, हे त्यांचे वक्तव्य हुकूमशाही प्रवृत्ती दाखवणारे आहे.” ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा नव्हे, हे नळावरचे भांडण- सपकाळ भ्रष्टाचारावरून थेट नार्को टेस्टचे आव्हान “एक कोटी खोटारडे लोक मेल्यावर काही लोक जन्माला येतात,” या फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेत सपकाळ यांनी त्यांना थेट आणि मोठे आव्हान दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना माझं खुलं आव्हान आहे की, आपण दोघांचीही नार्को टेस्ट करूया! मिसिंग लिंक कामात नेमका किती भ्रष्टाचार झाला आहे आणि काय सत्य आहे, हे त्यातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या,” असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. हेही वाचा.. मुसळधार पावसाला ब्रेक!:पुढील 10 दिवस महाराष्ट्रात तुरळक सरी; मात्र ‘या’ भागांसाठी अजूनही सतर्कतेचा इशारा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र हवामान विभाग आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी राहणार असली, तरी काही भागांमध्ये अधूनमधून जोरदार सरींची शक्यता कायम आहे. सविस्तर वाचा..

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp