वन्यप्राणी आडवा आल्याने दुचाकीचा अपघात: युवकाचा मृत्यू: वडगाव फत्तेपूर-परसापूर मार्गावर घटना, पोलिस तपास सुरू – Amravati News

वन्यप्राणी आडवा आल्याने दुचाकीचा अपघात:  युवकाचा मृत्यू: वडगाव फत्तेपूर-परसापूर मार्गावर घटना, पोलिस तपास सुरू – Amravati News



अचलपूरहून अमरावतीकडे येत असताना वडगाव फत्तेपूर–परसापूर मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात रामपुरी कॅम्प येथील गौरव वाधवा यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक वन्यप्राणी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, परतवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव नंदलाल वाधवा हे कपड्यांच्या व्यवसायातील वसुलीच्या कामानिमित्त नेहमी या मार्गावरून प्रवास करत होते. सोमवारी दुपारी ते एमएच-२७/सीवाय-७९८४ क्रमांकाच्या होंडा दुचाकीने अचलपूरहून अमरावतीकडे परतत होते.

वडगाव फत्तेपूर ते परसापूरदरम्यान त्यांची दुचाकी अचानक असंतुलित होऊन अपघातग्रस्त झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक वन्यप्राणी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याची शक्यता आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गौरव यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. पथ्रोट पोलिसांनी अपघाताची नोंद करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, पुढील तपास सुरू आहे.

अपघाताला केवळ वन्यप्राणी कारणीभूत होता की रस्त्याची स्थिती अथवा अन्य काही कारणे होती, याचाही तपास केला जात आहे. गौरव वाधवा यांच्या निधनामुळे रामपुरी कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »