Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पंढरपूरला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी एकदा नाही तर दोन वेळा विचार केला पाहिजे, असा टोला लगावताना रोहित पवार...
अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सहावी आणि सातवीचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या आंदोलनानंतर ही घोषणा केली. यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या वर्गांमुळे होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे...
अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, २५ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही ३१,३६७ जागा रिक्त असून, एकूण ४३,११० प्रवेश क्षमतेपैकी २० जूनपर्यंत केवळ ११,७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश...
राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली. जयकुमार गोरे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील आठ वर्षांत महाराष्ट्रासाठी केंद्र...
राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते विकासाबरोबरच रस्ते सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोज . रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आं...
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) ने बुधवारी अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाच्या मोफत शिक्षण संपवण्याच्या आणि शिक्षकांची संख्या घटवण्याच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दुपारपर्यंत कार्यालयाला घेराव घातला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वा...
राज्य शासनाच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरण आणि बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण बचाव समन्वय समितीने अमरावती जिल्ह्यात ‘मराठी शाळा वाचवा अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान २४ जूनपासून ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवले जाईल. समितीच्या मते, शासनाच्या या निर्णयामुळ...
अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवा...
चालू मान्सून हंगामात विदर्भात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने १ ते २४ जून २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः १२०....
राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अन्न व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिल...
बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले हे रंगमंदिर आता केवळ शहराचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी काढले. बालग...
छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर उभारण्यात येत असलेल्या ४०० खाटांच्या भव्य महिला व बाल रुग्णालयासाठी राज्य सरकारने ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा अधिकृत ठराव जारी केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णयानंतर, या रुग्णालयासाठी जमिनीपासून ते निधीपर्यंत प्रदीर्घ कायदेशीर आणि राजकीय लढा देणारे शह...
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची कबुली स्वतः सरकारने विधानसभेत दिली आहे. या योजनेचा तब्बल 12 हजार 415 शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लेखी उत्तरातून समोर आले असून, या अपात्र लाभार्थ्यांना सुमारे 165 कोटी रुपयांचा लाभ म...
मुंबईत मुसळधार पावसात थेट महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यांदेखत एक नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महापौर आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत शेलक्या...
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीकविम्यासह इतर २३ मागण्यांसाठी तीव्र अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, शरीराने साथ सोडलेली असतानाही तुपकरांचा बाणा कायम असून, त्यांनी रुग्णाल...
राज्यात लागू होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेचा 40 हजार कोटींचा खर्च सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जाईल, असा आरोप नागरी संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 16 हजार कोटी रुपयांचा थेट भार जनतेवर पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सक्तीवि...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा स्तरावर मोठा धक्का दिला आहे. ९ पैकी ६ खासदारांनी थेट सत्ताधारी गटात प्रवेश केल्यामुळे संसदेत तांत्रिकदृष्ट्या कोंडी झालेल्या ठाकरे गटाला आता लोकसभा अध्यक्षांनी आपली बाजू मांडण्यासाठी पाचारण केले आ...
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सभागृहात स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान झालेल्या भाषि . सभागृहात आपली भूमिका मांडताना राहुल नार्वेकर म्हणाल...
एकनाथ शिंदे यांना ज्या शिवसेनेने मोठे केले आहे, तो पक्ष न्यायालयातून आम्हाला वापस द्यायला लावला पाहिजे. न्यायव्यवस्था विकत घेत तुमची दादागिराी सुरू आहे का? पोलिसांचा माफियासारखा वापर करत तुम्ही ही दादागिरी करत आहात. तुमच्याकडे यंत्रणा आहे म्हणून तुमची ही दादागिरीचा भाषा आहे, ज्या दिवशी हे नसेल त्या दिवश...
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर मंगल कार्यालय, डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या...
. तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम चिंतेत सापडला आहे. जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ९६८.१३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी पाऊस व जमिनीत कि...
लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात आला. मंगळवारी (२३) सका . नाशिक शहरात रविवार कारंजा येथून मुख्य मिरवणूक निघणा...
राज्यात ‘महायुती’चे सरकार वरकरणी कितीही मजबूत दिसत असले आणि ‘ऑल इज वेल’चे दावे केले जात असले, तरी पडद्यामागे भारतीय जनता पक्षाने थेट 2029 च्या विधानसभा आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयका’नंतर राज्याचे र...
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा द...
दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुमताने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यां...
नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सिंगल यांच्याकडे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर नां...
पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ऑलिम्पिक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्र...
सीआयआय क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल), पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ हवेसाठी एका बहुभागधारक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी ‘डिसिजन सपोर्ट सिस्टिम’ (डीएसएस) या अभिनव प्लॅटफॉर्मच...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत दिनांक ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील या...
नागपूर शहर पोलिसांनी ‘ड्रग्समुक्त नागपूर-सुरक्षित नागपूर’ या ध्येयाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर २.०’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या अडीच वर्षांत २३.२१ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, १,५१५ तस्करांना अटक करण्यात आली...
महाराष्ट्र पोलिसांच्या ताफ्यात लवकरच एक अत्याधुनिक यंत्रणा सामील होणार आहे. गुन्ह्यांचा तपास अधिक काटेकोर, पारदर्शक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा बनवण्यासाठी ‘एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म’ विकसित केला जात आहे. राज्य सरकारच्या ‘मार्व्हल’ (MARVEL) या विशेष उद्देश संस्थेद्वारे ह...
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील किनारी सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी, माहिती देवाणघेवाणीतील विलंब, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि किनारी भागातील अपुरी देखरेख या समस्या अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिक सोशल फाउंडेशनने केंद्र व राज्य सरकारकडे...
हिंगोली जिल्ह्यात सरळ सेवेने भरती झालेल्या ३४ पैकी ३२ केंद्र प्रमुखांना मंगळवारी ता. २३ समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. अवघ्या एक तासात समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुख मिळाल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण हलका होणार आहे. या शिवाय गुणवत्तेवरही परिणाम होणार...
लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने...
ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात सूत्रसंचालन करताना केलेल्या विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते किरण पावसकर यांनी अखेर आपली भूमिका मांडली. “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्याचे धाडस मी स्वप्नातही करणार नाही, माझ्या विधानाचा त...
निधी मिळत नाही, निधी पुरत नाही, मतदारसंघातील जनतेची कामे झाली पाहिजेत, असे सांगत खासदारांनी किंवा आमदारांनी पक्ष बदलल्याचे आपण नुकतेच पाहिले असेल. नुकताच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी अशीच कारणे देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर खासदारांच्या अखर्चिक निधीचा मुद्दाही गाजला. यावरून विरोधकांनी त्य...
श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एका रस्ते अपघातात 17 वर्षीय शमशाद या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तमपूर गावाजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाला धडकली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याने प्राण सोडले. खरं तर, पटखौली रिहरवा येथील...
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह . 2019 ते 2024 चा 100% निधी खर्च! विरोधकां...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात घसघशीत वाढ करण्याच...
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेन . आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि ‘अकार्यक्षम...
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी असून कृषी खात्याने जिल्ह्यात डीएपीच्या 500 मेट्रीक टन पैकी 300 मेट्रीक टन बफर स्टॉक पाच तालु्क्यांसाठी रिलीज करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यां...
पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटलेली ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आह...
6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. “उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. ठाकरे गटात शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच लोक उरतील असा खळबळजनक दा...
ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर करत विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. “माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालो. पण जर कोणी...
येथील गौरखेडेपुरा स्थित आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक व घसा, नेत्र यासंबंधित विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांची तप...
गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या या पहिल्याच पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. अवघ्या ३५ मिनिटांत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरात १२ झाडे कोसळली असून, काही घरांवरी...