पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 20 जुलैपासून नि:शुल्क स्पर्धा परीक्षा वर्ग: प्रवेशासाठी 12 जुलैला विद्यापीठात निवड चाचणी – Amravati News

पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 20 जुलैपासून नि:शुल्क स्पर्धा परीक्षा वर्ग:  प्रवेशासाठी 12 जुलैला विद्यापीठात निवड चाचणी – Amravati News



संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी २० जुलैपासून नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होतील. या मार्गदर्शन वर्गात विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, बँक आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनुभवी मार्गदर्शकांकडून आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळेल. हा वर्ग तीन महिन्यांच्या कालावधीचा असेल. या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी १२ जुलै रोजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. निवड चाचणीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी व्यापक प्रशिक्षण मिळेल. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/t2SA6VwJWNvdKD57 या गुगल फॉर्मवर अर्ज करणे आवश्यक आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. के.सी. मोरे (वनस्पतीशास्त्र विभाग) यांच्याशी ९६०४३५८५१८ या भ्रमणध्वनीवर किंवा entry2services@sgbau.ac.in या ईमेलवर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाने कळवले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp