बालगंधर्वांचा 100 वर्षांहून जुना तानपुरा भेट दिला जाणार: परांजपे कुटुंबीय गोपाळ गायन समाजाला देणार ऐतिहासिक ठेवा – Pune News

बालगंधर्वांचा 100 वर्षांहून जुना तानपुरा भेट दिला जाणार:  परांजपे कुटुंबीय गोपाळ गायन समाजाला देणार ऐतिहासिक ठेवा – Pune News



संगीत परंपरेचे जतन करणाऱ्या गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीनिमित्त बालगंधर्वांचा ऐतिहासिक तानपुरा संस्थेला भेट देण्यात येणार आहे. पुण्यातील परांजपे कुटुंबीय हा तानपुरा गुरुवारी, २३ जुलै रोजी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या स्वरमैफलीच्या प्रारंभी सुपूर्द करतील, अशी माहिती तानपुरा जतन करणारे प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी दिली. हा तानपुरा बालगंधर्वांनी कै. कमलाबाई परांजपे यांना दिला होता. सन १९२१ मध्ये मुंबईत संयुक्त मानापमानचा प्रयोग होता, त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपला तानपुरा बालगंधर्वांना भेट दिला होता. बालगंधर्व पुण्यात आल्यावर कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे उतरत असत आणि त्यांना नाट्यपदे शिकवत असत. याच काळात केशवरावांनी दिलेला हा तानपुरा बालगंधर्वांनी परांजपे कुटुंबीयांकडे दिला होता. कमलाबाईंचे सुपुत्र, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी हा ऐतिहासिक ठेवा जतन केला आहे. शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली असली तरी, आजही हा तानपुरा देखणा आणि उत्तम स्थितीत आहे, अशी माहिती गोपाळ गायन समाजाचे डॉ. विकास कशाळकर यांनी दिली. गोपाळ गायन समाजाची स्थापना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने पं. गोविंदराव देसाई यांनी १९२६ साली केली होती. पं. गोविंदराव देसाई हे संगीतोद्धारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे पट्टशिष्य होते. गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी पुण्यामध्ये संगीताच्या प्रसाराचे कार्य सुरू केले आणि स्वतःचा संगीत अभ्यासक्रमही सुरू केला. गोपाळ गायन समाजच्या शतकोत्तर उत्सवाचा प्रारंभ कै. कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘रंगबहार’ या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमात सूरगंधर्व सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, केदार केळकर, अस्मिता चिंचाळकर, अभिनेत्री गात, रवींद्र कुलकर्णी (ऑर्गन), संजय गोगटे (ऑर्गन) आणि केदार कुलकर्णी (तबला) यांचा सहभाग असेल. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गुरुवारी हा तानपुरा भेट देण्यात येईल. डॉ. रामचंद्र परांजपे यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »