बेलपुऱ्यातील तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात: नागरिकांना धमकावत होता; एक हजार रुपयांचा चाकू जप्त – Amravati News

बेलपुऱ्यातील तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात:  नागरिकांना धमकावत होता; एक हजार रुपयांचा चाकू जप्त – Amravati News



अमरावती: शहर गुन्हे शाखेने बेलपुरा येथील एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून, आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, युवराज विजय कुरवाणे (वय २२, रा. बेलपुरा, अमरावती) हा बेलपुरा येथील न्यू हायस्कूलच्या मागील मैदान परिसरात सक्रिय होता. तो ये-जा करणाऱ्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करत होता. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी युवराज कुरवाणे याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान, त्याच्याकडून सुमारे एक हजार रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपी युवराज कुरवाणे हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे व प्रांजली सोनवणे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp