मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे निर्देश: मतदार पुनरिक्षण मोहीम अचूक, पारदर्शकपणे यशस्वी करा – Pune News

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे निर्देश:  मतदार पुनरिक्षण मोहीम अचूक, पारदर्शकपणे यशस्वी करा – Pune News



राज्याचे अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदारांना कोणताही त्रास न देता, प्रशासनाने सर्व घटकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वी करावी, असे ते म्हणाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आणि इतर मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेबाबत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया आणि रेडिओच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करावेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून सुटणार नाही आणि अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मतदार यादीतील नावे पूर्ण खात्री करूनच वगळावीत, असेही स्पष्ट करण्यात आले. ही मोहीम ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे माहितीची पडताळणी करतील. नाव, पत्ता किंवा छायाचित्रांमधील बदल नोंदवले जातील. तसेच पत्त्यावर नसलेले (ASD), स्थलांतरित, मृत आणि दुबार नावांची काटेकोर तपासणी केली जाईल. शासकीय निवासस्थानांमध्ये वास्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेऊन पुढील कारवाई केली जाईल. सन २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही, असेही यावेळी नमूद करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, सन २००२ मध्ये पुणे जिल्ह्यात ४६ लाख ९ हजार १२७ मतदार होते, ती संख्या २०२६ मध्ये ९० लाख ९० हजार ९७० वर पोहोचली आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे ४ हजार ५५७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) प्रत्यक्ष पडताळणीत सहभागी होणार आहेत. मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी मॅपिंग, मनुष्यबळाची नियुक्ती, प्रशिक्षण आणि फॉर्म छपाईची कामे पूर्ण झाली आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp