digital products downloads

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न: पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दखलपात्र गुन्ह्याची मागणी – Pune News

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न:  पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दखलपात्र गुन्ह्याची मागणी – Pune News



पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एका ३० वर्षीय तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बंडगार्डन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. राम शिवाजी पाचकाळे (वय ३०, रा. भोर, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने राजगड पोलीस ठाण्यात एका प्रकरणाबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी ती ‘अदखलपात्र’ गुन्हा म्हणून नोंदवली होती. आपली तक्रार दखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवली जावी, या मागणीसाठी तो सातत्याने पाठपुरावा करत होता. न्याय मिळत नसल्याच्या निराशेपोटी सोमवारी त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचा पाचवा मजला गाठला आणि तेथील सुरक्षा जाळीवर जाऊन बसला. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तरुणाशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या आश्वासनानंतर राम पाचकाळे याचे समाधान झाले आणि त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला. त्याला सुरक्षितपणे जाळीवरून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात नेले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp