प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा: अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश, धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा:  अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश, धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News



पुण्यात प्रार्थनेद्वारे कर्करोग आणि ट्यूमरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील एका प्रार्थनास्थळात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, चिंचवड येथील पास्टर केनेथ पॉल सिल्वे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिला येरवडा येथील रहिवासी असून, त्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. रविवारी (१४ जून) रोजी तक्रारदार महिला आणि त्यांची मैत्रीण कोंढव्यातील या प्रार्थनास्थळात गेल्या होत्या. त्यावेळी तेथे उपस्थित स्वयंसेवकांनी त्यांना २० रुपये घेऊन एका प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले. ‘कोणताही आजार झाला असेल, तर त्या भागावर हे पाणी लावा, त्यामुळे आजार कमी होईल,’ असे कार्यकर्त्यांनी महिलेला सांगितले. यानंतर धर्मगुरुने सभा घेतली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘शरीराच्या ज्या भागात आजार आहे, त्या भागावर उजवा हात ठेवा. कर्करोग, ट्यूमरसारखा कोणताही विकार असो, देव तुम्हाला बरे करणार आहे,’ असे धर्मगुरुने उपस्थितांना सांगितले. यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांच्या मैत्रिणीने घटनेचे चित्रीकरण केले. मात्र, तेथील महिला स्वयंसेवकांनी त्यांना मोबाईलवर चित्रीकरण करण्यास मनाई केली. तक्रारदार महिला आणि त्यांच्या मैत्रिणीला धक्काबुक्की करून त्यांच्या मोबाईलमधील चित्रफीत काढून (डिलिट) टाकण्यात आली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह अन्य कायद्यातील कलमांन्वये धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत मंडले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp