ग्रीन मोबिलिटीसाठी ब्रिक्स देशांनी सहकार्य करावे: नितीन गडकरींचे आवाहन; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर भर – Nagpur News

ग्रीन मोबिलिटीसाठी ब्रिक्स देशांनी सहकार्य करावे:  नितीन गडकरींचे आवाहन; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर भर – Nagpur News



केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांना शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी अधिक दृढ सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गडकरींनी अधोरेखित केले की, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या ब्रिक्स गटाकडे अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम जागतिक गतिशीलतेचे भविष्य घडवण्याची अभूतपूर्व क्षमता आहे. या बैठकीत नितीन गडकरी यांनी भारताच्या वाहतूक क्षेत्रातील परिवर्तनकारी सुधारणांचे सादरीकरण केले. भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे विकसित केले आहे. १०,००० किलोमीटरहून अधिक ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग, दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉर आणि सोनमर्ग बोगद्यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मल्टी-मोडल पायाभूत सुविधांची क्रांती घडवून आणली आहे. रेल्वे क्षेत्रात शंभर टक्के विद्युतीकरण, वंदे भारत रेल्वेचा विस्तार आणि बुलेट ट्रेन प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरी क्षेत्रात “मॅरिटाईम अमृत काळ व्हिजन २०४७’ आणि “ई-नाविक’ सारख्या डिजिटल उपक्रमांमुळे देशाचे अभूतपूर्व आधुनिकीकरण झाले आहे. “पीएम गतिशक्ती बृहद आराखड्यामुळे’ एकात्मिक विकास शक्य झाला असून लॉजिस्टिकचा खर्च कमी झाला आहे. ई-बसेसचा वापर आणि प्रादेशिक विमान प्रवासासाठीच्या “उडान’ योजनेमुळे देशांतर्गत संपर्क अधिक सुलभ झाला आहे. भारताच्या वाहतूक धोरणात सुरक्षा आणि पर्यावरणपूरकता केंद्रस्थानी आहे. रस्ते अपघातातील बाधितांसाठी “पीएम-राहत’ योजना राबवली जात आहे. तसेच, रस्ते बांधणीत प्लास्टिक कचरा, महानगरपालिकेचा घनकचरा आणि बांबूच्या क्रॅश बॅरियर्सचा वापर करून पर्यावरणाप्रती जबाबदारी जपली जात आहे. शेवटी, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, पर्यायी इंधन आणि डिजिटल वाहतूक यंत्रणा या क्षेत्रांमध्ये तांत्रिक सहकार्य, संयुक्त संशोधन आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट करत, सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे ही वाचा… देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहणार:जनतेचीही तीच भावना, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; दिल्लीवारीच्या चर्चांना पूर्णविराम
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथे एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि हीच राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सविस्तर वाचा… दिल्लीला जाणार का? प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल उत्तर!:शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे आणि मोशी दुर्घटनेवरही केले मोठे भाष्य संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ‘दिल्लीवारीच्या’ चर्चांना मिश्किल उत्तर दिले. यासोबतच राज्यातील पावसाची स्थिती, ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी, बोगस सोयाबीन बियाणे, नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आणि मोशी इमारत दुर्घटना अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. सविस्तर वाचा… एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी “भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे केले आहेत. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp