अयोध्या राम मंदिर देणगी अपहार: युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह, डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावतीत आंदोलन – Amravati News

अयोध्या राम मंदिर देणगी अपहार:  युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह, डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावतीत आंदोलन – Amravati News



अमरावती येथे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आज, शनिवारी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिरात हे प्रतीकात्मक आंदोलन झाले. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा निषेध केला. डॉ. देशमुख यांनी यावेळी बोलताना, “कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले आहेत,” असा घणाघात केला. आंदोलकांनी राम मंदिरातील दानपात्रांमधील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हा सत्याग्रह केवळ राजकीय नसून, श्रद्धेच्या रक्षणासाठी असल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. प्रभू श्रीरामाचे मंदिर हे राष्ट्राच्या एकतेचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले. मंदिरातील देणग्यांचा गैरव्यवहार हा संपूर्ण हिंदू समाजावर घाला घालणारा आहे. त्यामुळे खऱ्या दोषींना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डॉ. देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरही टीका केली. अयोध्या मंदिराबाबत कायम राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणारे सरकार दानपात्रातील लुटीवर एक शब्दही बोलायला तयार नाही, असे ते म्हणाले. या देणग्यांच्या लूट प्रकरणात पहिला एफआयआर दाखल करायला १८ दिवसांचा कालावधी लागला. एवढेच नव्हे, तर ट्रस्टमध्ये जबाबदार आणि महत्त्वपूर्ण घटक, जे एका विशिष्ट संघटनेच्या प्रभावाखाली आहेत, त्यांना वगळून केवळ छोट्या-मोठ्या लोकांवर कारवाईचा देखावा केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर तथा मनपा विरोधीपक्ष नेते विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, माजी महापौर मिलिंद चिमोटे व अशोक डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, नगरसेवक प्रशांत महल्ले, नगरसेविका अनिता काळे, लुबना तनवीर मुन्ना नवाब व राजश्री जठाळे, पुजारी रामरावजी मैदानकर, निरीक्षक अविनाश पांडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, सुजाता झाडे, डॉ. दिनेश गवळी, प्रदीप अरबट, दिनेश मेश्राम, गजानन रडके, समीर जवंजाळ, प्रा. अनिल देशमुख, आयुष रडके, देवेंद्र मुनघाटे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp