आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!: ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – Solapur News

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:  ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – Solapur News



सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगरसेवक व नगराध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे. पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी मलगुंडे यांना अपात्र ठरवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांच्या संयुक्त मालकीची पेठ-सांगली रोडवर, बसस्थानकाजवळ एक लॉजिंग आणि शॉपिंग सेंटरची मोठी इमारत आहे. ही इमारत थेट पेठ-सांगली राज्य महामार्गाला खेटून उभी करण्यात आली आहे. मलगुंडे यांनी भूमापन क्रमांक ८/१अ, ८/१अ/१२, ८/१अ/१३, ८/१ब आणि ८/२ या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून हे बांधकाम केल्याचे सिद्ध झाले आहे. आनंदराव मलगुंडे हे गेली अनेक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यांनी आपल्या याच पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून हे अनधिकृत बांधकाम केल्याचा थेट आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. माहिती अधिकार ते थेट अपात्रता… या संपूर्ण बेकायदेशीर बांधकामाला शिवसेनेचे नेते घनश्याम ऊर्फ जयकुमार जाधव यांनी आव्हान दिले होते. धव यांनी सुरुवातीला माहिती अधिकारांतर्गत (RTI) या इमारतीच्या बांधकाम परवानगीची आणि नियमितीकरणाची सर्व कागदपत्रे व माहिती मिळवली. ही माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी थेट सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याची मागणी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर सर्व पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर, जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी ‘महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम’च्या कलम ४४(१)(e) मधील तरतुदीनुसार आनंदराव मलगुंडे यांना दोषी मानत अपात्र ठरवण्याचा ऐतिहासिक निकाल दिला. राष्ट्रवादीला फटका; पुन्हा निवडणुकीची शक्यता ईश्वरपूर-इस्लामपूर हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आता मलगुंडे यांचे पद रद्द झाल्यामुळे आगामी काळात ईश्वरपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा नव्याने निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे ही वाचा… मुंबई मनपात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का:नवाब मलिकांच्या पुतणीचे नगरसेवक पद रद्द, जात प्रमाणपत्राचा मुद्दा नडला राजधानी मुंबईच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या पात्रतेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १७० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. बुशरा मलिक या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या पुतणी असून कॅप्टन मलिक यांच्या कन्या आहेत. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp