60 वर्षांची इमारत: 11 उपकेंद्रांचा भार सांभाळणाऱ्या केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, सव्वा लाख नागरिकांच्या आरोग्याचा आधार धोक्यात, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎ – Chhatrapati Sambhajinagar News

60 वर्षांची इमारत:  11 उपकेंद्रांचा भार सांभाळणाऱ्या केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, सव्वा लाख नागरिकांच्या आरोग्याचा आधार धोक्यात, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎ – Chhatrapati Sambhajinagar News


जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० वर्षांपूर्वीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, तब्बल सव्वा लाख लोकसंख्येचा भार वाहणारे हे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. या आर

.

इमारतीतील अनेक भागांतील स्लॅबचे काँक्रीट कोसळून छताच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. छताला मोठी भगदाडे पडली असून, पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण इमारत कमकुवत झाली आहे. अनेकदा स्लॅबचे मोठे तुकडे अचानक खाली पडत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात डेटा रूम, स्टोअर रूम आणि औषध भांडारात पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे आणि वैद्यकीय साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुराणा यांनी इमारतीची अवस्था गंभीर असल्याचे मान्य करत तातडीने नवीन इमारतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत जुने आहे. या इमारतीबाबत मी वरिष्ठ कार्यालयाशी, तसेच विभागीय अभियंत्यांशी नवीन इमारतीसाठी लेखी पत्रव्यवहार केला आहे. वरिष्ठांना वारंवार माहिती दिली जात असून, यावर्षी विभागीय कार्यालयाचे पथक इमारतीची पाहणी करण्यासाठी येणार आहे. लवकरच नवीन इमारतीचे काम मार्गी लागेल. – नासिर खान पठाण, तालुका आरोग्य अधिकारी, सिल्लोड

अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. छतातून पाणी गळणे, ड्रेनेज लाईन तुंबणे आणि अस्वच्छतेमुळे या परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कर्मचारी जीव मुठीत धरून कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे, दहा वर्षांत देखभालीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च झाल्याचे सांगितले जाते. मात्र, हा निधी नेमका गेला कुठे, असा सवाल आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp