
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून दिल्लीला बोलावले होते आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते, असा दावा खडसे यांनी केला आहे. मात्र, महाजन यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आणि ‘ब्लॅकमेलिंग’च्या राजकारणामुळे हा प्रवेश रखडल्याचा आरोप त्यांनी केला. एकनाथ खडसे पुढे म्हणाले, गिरीश महाजन आता सांगत आहेत की मी खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला नव्हता. पण मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले की, तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत.खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू, अशी ब्लॅकमेलिंग केली जात आहे. यामुळे वरिष्ठांनी मला सांगितले की, तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू. मला आता भाजपमध्ये जाण्यात अजिबात रस नाही एकनाथ खडसे म्हणाले की, विनोद तावडे आणि माझी झालेली भेट ही केवळ एक औपचारिक भेट होती. त्यांनी फक्त माझ्या तब्येतीची विचारपूस केली, यापलीकडे आमच्यात कोणताही राजकीय विषय किंवा चर्चा झालेली नाही. मला आता भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही रस राहिलेला नाही. मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच ठामपणे उभा राहीन. माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, पण मी जाणार नाही. माझे कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना तशी मुभा आहे, मात्र माझा निर्णय पक्का असून मी पवारांसोबतच राहणार आहे. महाजनांवर लक्ष देण्याची गरज नाही गिरीश महाजन यांनी खडसेंवर केलेल्या टीकले उत्तर देताना खडसे मिश्कीलपणे म्हणाले की, महाजन म्हणतात की मी फार लहान माणूस आहे, हे खरं आहे. पण ते स्वतः आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यांच्या मतदारसंघात तसे बोर्ड देखील लागले आहेत. मी आज त्यांच्याशीच संघर्ष करत आहे. ते मंत्री होईपर्यंत मी त्यांना त्यांच्या मतदारसंघात नेहमीच सहकार्य केले आहे. माझ्या सभा झाल्याशिवाय त्यांचा प्रचार कधी पूर्णच होत नव्हता. सध्या त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आशीर्वाद आहे. पण हा आशीर्वाद जर उद्या काढून घेतला, तर महाजन कुठेच नसतील अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या विधानांवर फार लक्ष देण्याची गरज नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
