महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?: भाजपला सर्वाधिक 48%, शिंदे सेनेला 29%, राष्ट्रवादीला 22% वाटा; कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपणार – Mumbai News

महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?:  भाजपला सर्वाधिक 48%, शिंदे सेनेला 29%, राष्ट्रवादीला 22% वाटा; कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपणार – Mumbai News



महायुती सरकारमधील रखडलेल्या महामंडळे आणि विविध शासकीय संस्थांवरील नियुक्त्यांबाबत अखेर मोठी हालचाल झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटूनही विविध महामंडळांवरील नियुक्त्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती. आता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपला सर्वाधिक वाटा सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील संख्याबळ आणि राजकीय वजन लक्षात घेऊन पक्षनिहाय वाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपला सर्वाधिक 48 टक्के महामंडळे आणि पदांचा वाटा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 22 टक्के वाटा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील इतर छोट्या घटक पक्षांसाठी एकूण 1 टक्का वाटा राखून ठेवण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर विविध महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्यांची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्था, संघटनात्मक बदल आणि इतर राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय सतत पुढे ढकलला गेला. यामुळे सत्ताधारी पक्षांतील अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्ते संधीच्या प्रतीक्षेत होते. आता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याने लवकरच नियुक्त्यांची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संख्याबळाच्या आधारावर वाटप सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा आणि सरकारमधील संख्याबळाचा विचार करून हे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वाधिक आमदारसंख्या असलेल्या भाजपला मोठा वाटा मिळाला असून, त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. छोट्या मित्रपक्षांमध्ये नाराजीची शक्यता महायुतीतील इतर घटक पक्षांच्या वाट्याला केवळ 1 टक्का हिस्सा आल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाल्याने महायुतीतील इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या फॉर्म्युल्याला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर विविध महामंडळांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्यांची घोषणा टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp