आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार: पिंप्राळा गावात अतिसाराचे थैमान, ग्रामस्थांना झाडाला सलाईन टांगून उघड्यावर उपचार; रोहित पवारांची टीका – Maharashtra News

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार:  पिंप्राळा गावात अतिसाराचे थैमान, ग्रामस्थांना झाडाला सलाईन टांगून उघड्यावर उपचार; रोहित पवारांची टीका – Maharashtra News



पाणीपुरवठा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातील पिंप्राळा या आदिवासी गावात अशुद्ध पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना घरासमोरील अंगणात आणि उघड्या मैदानातच उपचार घ्यावे लागत आहेत. झाडांना व दोऱ्यांना सलाईनच्या बाटल्या टांगून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “दोरीवर टांगलेले हे केवळ सलाईन नाहीत, तर आरोग्य विभागाची टांगलेली अब्रू आहे,” असा घणाघात त्यांनी केला. नागरिकांना शुद्ध पाणी आणि वेळेवर वैद्यकीय सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने वैद्यकीय पथक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उघड्या मैदानावर उपचार
पिंप्राळा गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिक या साथीमुळे बेजार झाले आहेत. गावात योग्य खाटा किंवा रुग्णालयाची सोय नसल्याने झाडांना आणि दोऱ्या बांधून त्याला सलाईन टांगण्यात आले आहे. जमिनीवर चटई किंवा गोणपाटावर झोपवून रुग्णांना सलाईन लावले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य विभागाची अब्रू टांगली – रोहित पवारांचा घणाघात या संतापजनक परिस्थितीचे फोटो ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि आरोग्य खात्यावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. रुग्णांना लावण्यासाठी दोरीवर टांगलेले हे केवळ सलाईन नाहीत, तर राज्याच्या आरोग्य विभागाची टांगलेली अब्रू आहे, असा थेट टोला त्यांनी लगावला. हे सरकार नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणीही देऊ शकत नाही आणि अशुद्ध पाणी प्यायल्याने अतिसार झाल्यावर उपचारही देऊ शकत नाही. म्हणूनच जनावरांवर उपचार करतात तसे उघड्या मैदानावर ग्रामस्थांना सलाईन लावण्यात आले. शरम वाटावा असा राज्याच्या आरोग्य खात्याचा हा कारभार आहे. असे रोहित पवार म्हणाले. तातडीने शुद्ध पाणी आणि वैद्यकीय पथक पाठवण्याची मागणी आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात जर अशी परिस्थिती असेल, तर राज्यातील दुर्गम भागातील जनतेने कोणाकडे पाहायचे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, सरकारने तात्काळ या आदिवासी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि पिण्याचे शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp