
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. ‘कोणालाही घाबरण्याचे कारण नाही’ नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही कोणाचेही घर उडवू देणार नाही किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारे धमकावू देणार नाही. अशा धमक्यांमुळे कुणीही घाबरू नये. जर कोणी धमक्या देत असेल तर पोलिस त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य आणि कठोर कारवाई करतील.” धमकीच्या वक्तव्यांवरून राजकारण तापले अलीकडेच माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या काही वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्यापुढे सर्व समान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता, धमक्या देणारे कोणत्याही पक्षाचे असोत, कायद्यापुढे सर्व समान आहेत, असा संदेश दिला. राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन कठोर पावले उचलेल, असेही त्यांनी नमूद केले. नागपूर विमानतळाचा विकास वेगाने; कार्गो हबच्या स्वप्नाला मिळणार बळ– फडणवीस नागपूर विमानतळाच्या संचालनाची जबाबदारी आज जीएमआरकडे (GMR) सोपवण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे नागपूरमध्ये अत्याधुनिक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ उभारला जाणार असून, मध्य भारतासाठी एक सक्षम हवाई वाहतूक परिसंस्था निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरला कार्गो हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्नही यामुळे पूर्णत्वास जाईल. विमानतळ विकासामुळे उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळून विदर्भासह संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संबधित बातमी वाचा… विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन: संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप
संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
