
हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे चांगली दाणादाण उडाली असून कळंबोली व वसमत तालुक्यातील अनेक भागांमध्ये केळी पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे तर हिंगोली तालुक्यातील पहिली गावांमध्ये 70 ते 80 घरावरील टीन पत्रे उडून गेल्यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे हिंगोली शहरामध्ये तसेच जिल्ह्यात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. जिल्ह्यात सुमारे एक ते दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील दिग्रस, दांडेगाव, सालापूर, डोंगरकडा या परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाची प्रचंड नुकसान झाले केळीचे घड खाली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय वसमत तालुक्यातील अनेक गावांमधून केळी च्या बागा उध्वस्त झाल्या. बागलपार्डी व इतर ठिकाणी वादळी वा-्यामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. केळीच्या बागात घड खाली पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे सुमारे 60 ते 70 घरावरी टीन पत्रे उडून गेली. यामुळे शेतकऱ्यांची तसेच गावकऱ्यांची चांगली धावपळ झाली. पेरणीसाठी आणून ठेवलेली बियाणे व खते या पावसामुळे भिजल्याने मोठे नुकसान झाले. याशिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. पावसाचे पाणी थेट घरात आल्यामुळे संसार उपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. पाऊस थांबल्यानंतर पत्रे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची चांगली धावपळ झाली होती. पहिल्याच मोठ्या पावसामुळे जिल्ह्यात चांगली दाणादाण उडाली आहे. याशिवाय हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर झाड तोडून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता दुपारी खंडित झालेल्या वीस पुरवठा रात्री उशिरा सुरळीत झाला आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
