
चुलत भावाचा खून करून मृतदेह जंगलातफेकून दिला, त्यानंतर तो बेपत्ता असल्याचेभासवण्यासाठी मृताच्याचमोबाइलवरून त्याच्यावडिलांना मेसेज करूनपैशांची मागणी केलीआणि स्वतःच पोलिसठाण्यात जाऊन तोहरवल्याची तक्रार दिली.अत्यंत थंड डोक्याने कटरचून केलेला या गुन्ह्याचा सिडको पोलिसांनीपर्दाफाश केला आहे. अपहरणाचा बनावरचणाऱ्या आरोपी चुलत भावाला मोबाइललोकेशनच्या आधारे गजाआड करण्यात आलेआहे. राजू रामू बनसोड (२५, रा. पाथ्री, ता.फुलंब्री) असे मृताचे नाव असून आरोपी रोहितबनसोड याला बेड्या ठोकल्या आहेत. राजू आणि रोहित यांचे कुटुंब मजुरी करणारेहोते. राजूचे कुटुंब मात्र शहरात येऊनस्थिरावले. या प्रगतीचा मत्सर रोहितला वाटतहोता. याच ईर्षेतून त्याने हत्येचा कट रचला.घटनेच्या दिवशी आरोपीने राजूला पाथ्री येथेनेले. तेथे घनदाट जंगलात भोसकून त्याचीहत्या केली व मृतदेह तेथेच टाकून दिला. तपासाला लागले १४ दिवस मृत राजू २४ मे रोजी बेपत्ताझाल्याची तक्रार सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतरत्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात चकरा मारून तपासासाठी पोलिसांकडेतगादा लावला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृत आणित्याचा चुलत भाऊ यांचे मोबाइल लोकेशन वारंवार एकाच ठिकाणीआढळल्याने खुनाचा उलगडा झाला. त्यासाठी १४ दिवस लागले. कुजल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन अन् अंत्यसंस्कार मृतदेह पंधरा दिवसांपासून जंगलात पडून असल्याने तो अत्यंत कुजलेल्याअवस्थेत होता. त्यामुळे घटनास्थळावरच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राजूवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. यागुन्ह्याची उकल सिडको पोलिसांनी केली. एकाच मोबाइल लोकेशनमुळे घटनेचा उलगडा मुलगा बेपत्ता झाल्याने आणि पैशांचा मेसेज आल्याने कुटुंबीय भयभीत झालेहोते. त्यांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांचा आपल्यावर संशय येऊ नयेम्हणून आरोपी रोहितने स्वतःच सिडको पोलिस ठाण्यात जाऊन राजू बेपत्ताअसल्याची तक्रार नोंदवली. राजू गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता होता आणित्याचदरम्यान त्याच्या मोबाइलवरून रोहित राजूच्या वडिलांना मेसेज करतहोता. ही बाब वडिलांनी पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी संशयितरोहित आणि मृताच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता ते एकचअसल्याचे समोर आले. संशयाची सुई रोहितकडे वळताच पोलिसांनी त्यालाताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली आणिमृतदेह जंगलात फेकून दिल्याचे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
