
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सभागृहात स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान झालेल्या भाषि
.
सभागृहात आपली भूमिका मांडताना राहुल नार्वेकर म्हणाले की, त्या दिवशी शोकप्रस्तावाची जी प्रिंट माझ्याकडे आली होती, ती अत्यंत अस्पष्ट होती आणि त्याचा फॉन्टही खूप लहान होता. त्या मजकुरात काही चुका होत्या, ज्या सुरुवातीला माझ्याकडून नोट केल्या गेल्या नव्हत्या. वाचन करत असताना ते जशाच्या तसे वाचण्याची चूक माझ्याकडून घडली. परंतु, यामागे माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता.
मलाही मराठी भाषेचा अभिमान
राहुल नार्वेकर म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांपासून मी सभागृहाचा अध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने काम पाहत आहे. या प्रदीर्घ काळात मी माझी अनेक भाषणे मराठीतूनच केली आहेत, तसेच अनेक शोकप्रस्तावही मराठीत मांडले आहेत. या सभागृहाचे संपूर्ण कामकाज नेहमी मराठी भाषेतूनच हाताळले गेले आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मातृभाषेचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान मलासुद्धा मराठी भाषेबद्दल आहे.
..तर मी नापासून दिलगिरी व्यक्त करतो
राहुल नार्वेकर म्हणाले की, या राज्यात दिवंगत आशाजींबद्दल कोणीही अनादर व्यक्त करू शकत नाही आणि विधानसभा अध्यक्ष तर असे मुळीच करू शकत नाहीत. जे काही घडले ते केवळ तांत्रिक चुकीमुळे घडले आहे, त्यामुळे या प्रकरणाचा कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, अशी मी सर्वांना विनंती करतो. या अनपेक्षित चुकीमुळे जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी सभागृहात मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत अध्यक्षांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हे ही वृत्त वाचा
मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवा- संजय राऊत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मराठी येत नाही त्यांनी मराठीचा अपमान केला आहे. त्यांना किंवा मुख्यमंत्र्यांनी जनेतची माफी मागितली पाहिजे. विरोधी पक्ष काय करतो आहे हा प्रश्न माझ्यापुढे पडला आहे. मी जर सभागृहात असतो तर मी त्यांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारले असते. माझ्यासारखे अजून 10 लोकं असते तर जांबुवंतराव धोटे यांचे स्मरण करत मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात आवाज उठवला असता. वाचा सविस्तर
मराठीची चिरफाड केली:राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
