चंद्रपुरात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू: अवयव शाबूत, तरीही मृत्यूचे कारण गूढ; वर्षभरात 42 वाघांचा बळी – Nagpur News

चंद्रपुरात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू:  अवयव शाबूत, तरीही मृत्यूचे कारण गूढ; वर्षभरात 42 वाघांचा बळी – Nagpur News



चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. सावली तालुक्यातील मूल येथील चिकली चक क्रमांक २ मधील सर्व्हे नंबर ७८ च्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृत्यू अत्यंत संशयास्पद मानला जात आहे. ३० जून २०२६ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास स्थानिक वनकर्मचाऱ्यांच्या गस्तीदरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. प्राथमिक अंदाजानुसार, वाघाचा मृत्यू साधारणपणे एक दिवसापूर्वी झाला असावा. घटनेची माहिती मिळताच सावलीचे परिक्षेत्र वन अधिकारी विनोद दुर्वे यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. तपासणीदरम्यान मृत वाघाचे सर्व अवयव जसे की नखे, सुळे आणि कातडी पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अवयवांसाठी किंवा थेट शिकारीचा प्रकार प्राथमिक पातळीवर दिसत नाही. मात्र, बिगर वनक्षेत्रात एका धडधाकट वाघाचा मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. यामुळेच हा मृत्यू अधिक संशयास्पद मानला जात असून, विषबाधा किंवा अन्य अंतर्गत कारणांची शक्यता नाकारता येत नाही. हा मृत्यू अधिक चिंताजनक ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार यापूर्वीच्या वर्षभरात राज्यात तब्बल ४१ वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. आता या नवीन घटनेमुळे वर्षभरातील वाघांच्या मृत्यूची संख्या ४२ वर पोहोचली आहे. आधीच मोठ्या संख्येने वाघांचा बळी गेलेला असताना, चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका वाघाचा असा संशयास्पद मृत्यू होणे हे वनविभागाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. यापूर्वी मे २०२६ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील हजारीचक येथील एका शेतातील उघड्या विहिरीत पडून ७ ते ८ वर्षे वयाच्या एका नर वाघाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp