मुंबईत चिमुरडीवर अत्याचार: आरोपींना कायद्याचा धाक उरलेला नाही, ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करा- रोहित पवार – Mumbai News

मुंबईत चिमुरडीवर अत्याचार:  आरोपींना कायद्याचा धाक उरलेला नाही, ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करा- रोहित पवार – Mumbai News

सरसकट सर्वच खटल्यात तातडीने न्याय मिळत नाही, म्हणूनच आरोपी निर्ढावले आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, तातडीने शक्ती कायद्यासारखा कायदा लागू करणं आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील

.

रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत पायधुनी परिसरात एका अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर वॉचमनने अत्याचार केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना घडली. सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यासाठीच खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक आहे. याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. पिडीत चिमुकली लवकर बरी व्हावी, ही प्रार्थना अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित 7 वर्षांची मुलगी आपल्या इमारतीमधील वॉशरूममध्ये गेली होती. याच वेळी इमारतीत तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने वॉशरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपीला अटक; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

या घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नागरिकांचा रास्तारोको

घटनेची माहिती परिसरात पसरताच शेकडो नागरिकांनी एकत्र येत पायधुनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला, ज्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. नराधम आरोपीला तत्काळ पोलिस स्टेशनमध्येच फाशी द्या, अशी आक्रमक मागणी जमावाने केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घेराव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधुनी पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, उद्विग्न झालेल्या जमावाने आणि पीडितेच्या नातेवाईकांनी त्यांनाही थेट घेराव घालत आपला जोरदार रोष व्यक्त केला.

संबंधित वृत्त वाचा

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

मुंबईत चिमुरडीवर अत्याचार: आरोपींना कायद्याचा धाक उरलेला नाही, ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करा- रोहित पवार - Mumbai News

मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 7 वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून पाशवी लैंगिक अत्याचार केला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली आहेत. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp