digital products downloads

नागपुरात भररस्त्यात भिकाऱ्यांच्या दोन गटांत तुफान राडा: किरकोळ वादातून हाणामारी अन् दगडफेक; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण – Nagpur News

नागपुरात भररस्त्यात भिकाऱ्यांच्या दोन गटांत तुफान राडा:  किरकोळ वादातून हाणामारी अन् दगडफेक; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण – Nagpur News


उपराजधानी नागपूरमधील गजबजलेल्या कस्तुरचंद पार्क जवळील एलआयसी चौकात आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत थरारक हाणामारी झाल्याची घटना घडली. भर वाहतुकीत झालेल्या या दगडफेकीमुळे आणि लाठ्याकाठ्यांच्या वापरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एलआयसी चौकातील सिग्नलवर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. यावेळी दोन गटांमध्ये कोणत्यातरी किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. मात्र, काही वेळातच या वादाने हिंसक वळण घेतले. दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठमोठे दगड भिरकावण्यास सुरुवात केली, तर काही जण लाकडी काठ्या घेऊन एकमेकांवर धावून गेले. गजबजलेल्या या चौकात अचानक सुरू झालेल्या या राड्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.

नागरिकांचा पोलिसांच्या विलंबावर संताप

या भीषण हाणामारीमुळे चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने, या दगडफेकीत कोणत्याही वाहनचालकाला किंवा पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही गटांतील काही भिकारी जखमी झाले आहेत. उपस्थित नागरिकांनी तातडीने ‘सदर’ पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. मात्र, माहिती देऊनही पोलीस बराच वेळ घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.

नागपुरात भिकाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली

नागपूर शहरात सध्या सिग्नलवर भिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे. केवळ भीक मागणेच नव्हे, तर वाहनचालकांना पैसे देण्यासाठी जबरदस्ती करणे, पैसे न दिल्यास अश्लील शिवीगाळ करणे, धावत्या वाहनांच्या बोनटवर बसून राहणे अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजच्या या घटनेमुळे या भिकाऱ्यांमधील आपापसातील टोळीयुद्ध आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठत असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा…

लग्नातील गमतीचा झाला ‘राडा’:बुट लपवण्यावरून वधू-वर पक्ष भिडले, महिलांमध्येही ‘फ्री-स्टाईल’, जालन्यातील घटना; VIDEO

लग्नामध्ये नवरदेवाचे बूट चोरण्याची आणि त्या बदल्यात मानपान किंवा पैसे मागण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र, जालन्यातील अंबड तालुक्यातील नांदी परिसरात या परंपरेने लग्नाचा आनंद विरघळवून टाकला. बूट परत करण्याच्या बदल्यात मागितलेल्या पैशांवरून वधू आणि वर पक्षामध्ये असा काही वाद पेटला की, दोन्ही बाजूचे वऱ्हाडी थेट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या राड्यामुळे मंगल कार्यालयाला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial