शू रॅकमध्ये चावी ठेवणे पडले महागात: घरातून 1.41 लाखांचे दागिने चोरी, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Pune News

शू रॅकमध्ये चावी ठेवणे पडले महागात:  घरातून 1.41 लाखांचे दागिने चोरी, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Pune News



घराबाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे एका कुटुंबाला महागात पडले आहे. या चावीचा वापर करून चोरट्याने सदनिकेत प्रवेश करत कपाटातून एक लाख ४१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना लोणी काळभोर येथे घडली असून, लोणी काळभोर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका तरुणाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरातील साईरंग सोसायटीत राहतो. कामानिमित्त बाहेर जाताना तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी सदनिकेची चावी घराबाहेर असलेल्या पादत्राणांच्या जाळीत लपवून ठेवली होती. चोरट्याने याच लपवलेल्या चावीचा वापर करून सदनिकेचे कुलूप उघडले आणि आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून एक लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस कर्मचारी सागर जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ब्युटी पार्लर मध्ये अंगठी चोरी दरम्यान, नांदेड सिटी भागात एका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेने ग्राहक महिलेची ३० हजार रुपयांची अंगठी चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ब्युटी पार्लर मालक महिलेने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ जून रोजी दुपारी एक महिला ग्राहक ब्युटी पार्लरमध्ये आली होती. तिने आपली अंगठी टेबलवर ठेवली होती. ग्राहक महिलेचे लक्ष नसताना ब्युटी पार्लरमधील महिलेने सोन्याची अंगठी चोरली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरेश खरमाटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp