
चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने तिला जाळ्यात ओढले. तिला चित्रपटात काम मिळवून देणार असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. चित्रपटात काम मिळवून न दिल्याने तरुणीने विचारणा केली. तेव्हा आरोपीने तरुणीची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत. नदीपात्रात एकाचा गळा चिरून खून झेड ब्रीज जवळील व लकउी पुल यांच्या मधील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत एका अज्ञात तरूणाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी साडेसात वाजता समोर आला आहे. खून झालेलया तरूणाची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी मात्र डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अमंलदार आकाश बाळासाहेब सोनवणे (32, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली मात्र मृत्यू झालेल्याची ओळख अद्याही पटू शकली नाही. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






