
निवडणूक आयोगावर कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, पण उबाठा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा दिसून येत आहे. उबाठा काँग्रेसची चाकरी करत आहे, त्यांची गुलामी करत आहे. उबाठा गटाच्या शिल्लक कार्यालयावर काँग्रेस झेंडा आणि तिथून काँग्रेस विचार पसरवण्याचे काम सुरू आहे, हेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे धोरण झाले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, बारामती आणि राहुरीमध्ये महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील, जनता महायुतीसोबत आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली आहे. बारामतीकर हे सुनेत्रा पवार यांच्या पाठिशी आहेत. तिथे मविआने जे सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. राहुरीमध्ये जनता महायुतीच्या बाजून आहे तिथे अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित आहे. बारामती अजित पवारांच्या वारसाकडेच असणार नवनाथ बन म्हणाले की, बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना व्हावा ही रोहित पवार यांची इच्छा आहे. कारण ते स्वत:ला महाराष्ट्राचे स्वयंघोषित मोठे नेते समजतात. त्यांना वाटते की महाराष्ट्रात शरद पवार यांच्यानंतरचा बडा नेता मीच आहे. म्हणून प्रत्येक मुद्द्यावर ते भाष्य करत असतात. अजित पवार असल्यापासून रोहित पवार बारामती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2029 मध्येही त्यांची डाळ शिजणार नाही. बारामती अजित पवारांच्या वारसाकडेच असणार हे रोहित पवार यांनी लक्षात ठेवले पाहिजे. भाजपची सत्ता येणार नवनाथ बन म्हणाले की, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिआ आघाडीतील पक्षांचा पराभव होत असल्याने संजय राऊत यांच्या पायाखालची वाहू सरकली आहे. तिथली जनता ममता बॅनर्जी यांच्या दहशत जुगारत मतदानासाठी बाहेर पडत आहे. तिथे भाजपची सत्ता येणार आहे. म्हणून संजय राऊत हे कधी संविधान तर कधी निवडणूक आयोगावर शंका घेणार आहेत. तामिळनाडूमधील जनता स्टॅलिन यांना वैतागली आहे. तर पश्चिम बंगालमधील जनता ममता बॅनर्जी यांना वैतागली आहे. त्यामुळे यंदा तिथे भाजपचीच सत्ता येणार आहे. स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या नवनाथ बन म्हणाले की, भाजप आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडूची चिंता करते पण तुम्ही मात्र काँग्रेसची चिंता करायला लागले आहात. तुम्हाला तुमच्या पक्षाचे काय होईल या पेक्षा काँग्रेसचे आसाममध्ये काय होईल हे महत्त्वाचे वाटायला लागले आहे. तुम्हाला स्टॅलिन, ममता बॅनर्जीची चिंता आहे. उरणमध्ये उबाठा गट नाही त्याची चिंता करा. आदित्य ठाकरे उबाठा गटाचे कार्याध्यक्ष होणार असून त्यांना पद मिळताच राऊतांची पक्षातून हकालपट्टी होणार आहे. त्याबद्दल तुम्ही चिंता करायला हवी.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






