digital products downloads

रक्तदानातून वाढली थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांची जीवनरेखा: उन्हाळ्यात रक्त टंचाईमुळे पालक चिंताग्रस्त, 28 जणांच्या रक्तदानातून दिलासा – Akola News

रक्तदानातून वाढली थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांची जीवनरेखा:  उन्हाळ्यात रक्त टंचाईमुळे पालक चिंताग्रस्त, 28 जणांच्या रक्तदानातून दिलासा – Akola News


थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी रक्त म्हणजे अक्षरशः जीवनरेखा असते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या रक्त टंचाईमुळे या निरागस जीवांच्या पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक पालकांना डोनरच्या शोधात भटकंती करावी ल

.

शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या केवळ ५० टक्केच रक्तसाठा उपलब्ध आहे. दररोज अंदाजे १०० रक्तपिशव्यांची गरज असताना फक्त ४५ ते ५० पिशव्या मिळत आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. उपलब्ध मर्यादित रक्तसाठा प्रसूती, शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील रुग्णांना प्राधान्याने दिला जात आहे. त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी रक्त मिळवणे अधिक कठीण जात आहे. एका पालकाने सांगितले की, ‘आमच्या मुलाला दर १५-२० दिवसांनी रक्त द्यावे लागते. परंतु आता प्रत्येक वेळी डोनर शोधणे अवघड झाले आहे. कधी कधी तर रात्रभर फोन करून लोकांना विनंती करावी लागते.’ अशा कठीण परिस्थितीत इंटरनेशिया, कौलखेड शाखा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर आशेचा किरण ठरले आहे.

अंकित कुमार श्रॉफ म्हणाले की, ‘थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी रक्त हीच जीवनरेखा आहे. उन्हाळ्यात रक्तटंचाई तीव्र होत आहे. त्यामुळे समाजाने पुढे येऊन नियमित रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे.’ रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून, एका जीवाला दिलेली नवसंजीवनी आहे. प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान केल्यास या चिमुकल्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि आशादायी होऊ शकते.

एक पिशवी रक्तातून एकाला नवजीवन

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp