घृष्णेश्वर मंदिरात सोळाव्या अतिरुद्र अभिषेक महोत्सवास उत्साहात सुरुवात: वेरूळच्या घृष्णेश्वर महादेवास हरिद्वारच्या गंगाजलाने अभिषेक‎ – Chhatrapati Sambhajinagar News

घृष्णेश्वर मंदिरात सोळाव्या अतिरुद्र अभिषेक महोत्सवास उत्साहात सुरुवात:  वेरूळच्या घृष्णेश्वर महादेवास हरिद्वारच्या गंगाजलाने अभिषेक‎ – Chhatrapati Sambhajinagar News


अधिक मासानिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात सोळाव्या अतिरुद्र अभिषेक महापूजा महोत्सवास शुक्रवारी वैदिक मंत्रघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. नऊ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामुळे संपूर्ण वेरूळ परिसर शिवमय झाला आहे

.

हरिद्वार येथून आणण्यात आलेल्या पवित्र गंगाजल कलशाची सकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर निघालेल्या मिरवणुकीत ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. ठिकठिकाणी भाविकांनी गंगाजल कलशाचे उत्स्फूर्त स्वागत करून पूजन केले. त्यानंतर वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात श्री घृष्णेश्वर महादेवावर पवित्र गंगाजलाचा अभिषेक करण्यात आला.

अधिक मासात दर तीन वर्षांनी एकदा हा अतिरुद्र अभिषेक महोत्सव आयोजित केला जातो. यंदा सोळावे वर्ष असून यासाठी राज्यभरातून हजारो भाविक वेरूळमध्ये दाखल होत आहेत. या महोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात येथून शेकडो वेदपाठी, ऋत्विज आणि ब्रह्मवृंद आले आहेत. त्यांच्या रुद्रपठण व मंत्रघोषाने मंदिर परिसर आणि संपूर्ण वेरूळ नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. या महोत्सवामुळे वेरूळमध्ये भाविकांची अलोट गर्दी होत आहे. भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा व मनःशांतीचा अनुभव मिळत असल्याची भावना लक्ष्मण वैद्य यांनी व्यक्त केली. सोहळ्याच्या सांगतेला महाप्रसाद व महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp