
पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली शिक्षक सुरेश बोरसे यांच्या छातीवर लाथा मारल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींवर खुनाचे ३०२ कलमका लावले नाही? याची मी वरिष्ठ पातळीवर चौकशी करणार आहे. तसेच आरोपींना तात्काळ जामीन मिळण्यामागे मोठी लिंक असून, राजकीय दबावाची चौकशी करण्यास भाग पाडू, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. ‘मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासारखी परिस्थिती झाल्याचे नमूद केले. न्याय न मिळाल्यास आरोपींना त्यांच्या गावातून पिटाळून लावू,’ असा थेट इशारा त्यांनी एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांना दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी बोरसे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच कायदेशीर लढ्यात सोबत राहण्याचेआश्वासन दिले. या घटनेनंतर हळूहळूदोषींवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे.त्यामुळे पोलिसांनी घटनेतील दोषी पोलिसअधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावेगुन्ह्यात नोंदवावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. खुनाचा गुन्हा दाखल व्हावा : शिक्षक संघटना दोषींवर ३०२ गुन्हा दाखल होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शिक्षक संघटनांनी केलाआहे. शिक्षक बोरसे हे धार्मिकव सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्त्व होते. महाविकास आघाडी गृह विभागाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री अतुल सावे व आमदार प्रशांत बंब हे देखील आज वेरूळला बोरसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा करा : मृताची आई माजी खासदार खैरे यांनी बोरसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा मृत शिक्षक बोरसे यांच्या आई मालतीबाई बोरसे यांनी टाहो फोडला. “माझ्यासाठी माझाडोंगर गेला… कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्यांना कडक शिक्षा होऊन न्यायमिळावा,’ अशी विनंती त्यांनी केली. यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. दोषींवर कठोर कारवाई करावी : आमदार काळे शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. पीएसआय नागरगोजेंसह इतरांची चौकशी सुरू प्रकरणातील व्हिडिओत आरोपी दिसतअसले तरी, घटनेच्या दुसऱ्या दिवशीसकाळी ९ वाजताच तक्रार नोंदवली आहे.कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरुवातीलाअनोळखी व्यक्ती असा उल्लेख करावालागला. तपासादरम्यान जे संशयितनिष्पन्न झाले आहेत, त्यांची नावे गुन्ह्यातसमाविष्ट केली आहे. उपनिरीक्षकनागरगोजे व इतर कर्मचाऱ्यांची चौकशीसुरू आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्धझाल्यास किंवा ते दोषी आढळल्यासकठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. – प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक, ग्रामीण व्हिडिओ फुटेजआधारे तपास -अग्निहोत्री गेल्या चार दिवसांपासून फॉरेन्सिक टीम, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि मोबाईल व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरूअसून, पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. आरोपींनासूट न देता तात्काळ न्यायालयात चार्जशीट दाखल केली जाईल, असे एएसपी अपराजिता अग्निहोत्री यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
