अंजनगावच्या फुलांच्या बाजारात आग: अग्निशमन दलाने दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले, इलेक्ट्रिक पॅनल पूर्णपणे जळून खाक – Amravati News

अंजनगावच्या फुलांच्या बाजारात आग:  अग्निशमन दलाने दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले, इलेक्ट्रिक पॅनल पूर्णपणे जळून खाक – Amravati News



अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध कुसुम मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागली. या आगीत दोन महिला अडकल्या होत्या, ज्यांना नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आगीमुळे येथील इलेक्ट्रिक पॅनल पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची तीव्रता अधिक असल्याने अंजनगाव शहरातील नगरपालिका अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या आदेशाने अग्निशमन विभागाचे मुख्य फायरमन अरुण माकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. त्यांनी जीवाची पर्वा न करता आत अडकलेल्या सुनंदाताई सरोदे आणि उज्वलाताई पिंगे या दोन महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. या बचाव पथकात आशिष कोळाखरे, कलाम भाई, मयूर नावंडकर, पवन सहारे आणि आशिफभाई यांचा समावेश होता. या पथकाने अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेनंतर मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी आगीतून वाचलेल्या महिलांशी संवाद साधला. या बचावकार्यात फायर सूटचा प्रभावी वापर करण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे फायर सूटची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अंजनगाव नगरपालिकेला नुकतेच ६ फायर सूट मिळाले होते. या फायर सूटच्या वापराचे प्रशिक्षण जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा आणि फायर सूटचा यावेळी अत्यंत फायदेशीर उपयोग झाला, ज्यामुळे बचावकार्य अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »