digital products downloads

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार: पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट – Nagpur News

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:  पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट – Nagpur News



भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपी नराधम सोमा सालिक मेश्राम (37) याला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. भंडारा तालुक्यातील मोहदुरा गावात मैत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच जिवाभावाच्या मैत्रिणीच्या वडिलांनी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलगी आणि आरोपी सोमा मेश्रामची मुलगी एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती, याच विश्वासाचा गैरफायदा नराधम चुलत्याने घेतला. गुरुवारी रात्री पीडित मुलगी मैत्रिणीकडे मुक्कामी असताना, आरोपीने तिला दुचाकीवर फिरायला नेण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले आणि गुंजेपार परिसरातील एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढवलेला भीषण प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. ही बातमी गावात समजताच सर्वत्र संतापाची लाट उसळली, मात्र समाजात होणारी चर्चा आणि झालेल्या अत्याचारामुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या पीडित मुलीने टोकाचे पाऊल उचलत विषप्राशन केले. तिला तात्काळ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भंडारा पोलिसांनी तातडीने हालचाली करत नराधम आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, या धक्कादायक प्रकारामुळे पुन्हा एकदा महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp