राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज: TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर – Mumbai News

राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज:  TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर – Mumbai News



टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. “राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज असून, जर पोलिस निरीक्षकाने वेळीच कारवाई करून हा डाव उधळला नसता, तर परीक्षा झाल्यावर राज्यात मोठी बोंबाबोंब झाली असती,” अशी थेट कबुली देत मुनगंटीवार यांनी भर अधिवेशनात सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पैसे ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या नाशिकची निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापतात त्या आग्र्याला, हे बंद करून राज्यातच प्रश्नपत्रिका छापाव्यात. या गुन्ह्यात किंवा पेपर फोडण्यात महाराष्ट्राचा माणूस नाही. याचा अर्थ असाही झाला की तिजोरीत पैसे ठेवले आणि तिजोरीला चावीच नाही. आता त्या इन्सपेक्टरचे अभिनंद. कारण त्याने लगेच कारवाई केली. अन्यथा, परीक्षा झाल्यावर जर बोंबाबोंब झाली असती तर आधीच आपल्यावर तरूण ओरडतो नंतर आणखी ओरड झाली असती, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आलेले नाही. पक्षातील एका अत्यंत वजनदार आणि अनुभवी नेत्याला डावलून मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याने, सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. TET पेपरफुटी प्रकरण:पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती दरम्यान, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी परीक्षार्थींकडून मोठी रक्कम उकळून या प्रश्नपत्रिकांची विक्री करण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी वेळीच सापळा रचून त्यांचा हा डाव उधळून लावला. भिवंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो परीक्षार्थींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षिततेचा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp