digital products downloads

वातावरणात बदल: 10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान – Nashik News

वातावरणात बदल:  10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान – Nashik News



एरव्ही थंड तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तपमानाला कुठेतरी आता ब्रेक लागला असून, दहा दिवसानंतर निफाडचे तापमान ३७ अंशांवर येऊन पोहोचले आहे. सहा अंशांनी पारा घसरल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. तालुक्यातील नागरिकांना ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले तरी सहन होत नव्हते, अशी परिस्थिती असताना यंदा २७ एप्रिलला ४३.१ इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा काहीसा कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दीपक जाधव, हवामान तज्ञ १० ते १७ पर्यंत तापमान पुन्हा ४० ते ४१ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे १३ ते १७ मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यांनतर तापमानात काही अंशी घट होईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp