digital products downloads

खरिपातही सोयाबीनच किंग, रेणापुरात 41 हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज: तालुक्यात खरीपपूर्व मशागतीला वेग; 45 हजार 900 हेक्टरचे नियोजन‎ – Jalgaon News

खरिपातही सोयाबीनच किंग, रेणापुरात 41 हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज:  तालुक्यात खरीपपूर्व मशागतीला वेग; 45 हजार 900 हेक्टरचे नियोजन‎ – Jalgaon News


एप्रिल महिना संपताच रेणापूर तालुक्यातील शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. तालुक्यात यंदा ४५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक, म्हणजेच तब्बल ४१ हजार १

.

सध्या शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टरचे भाडे प्रतिएकर ३ ते ५ हजार रुपयांवर गेल्याने लहान आणि मध्यम अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. वाढता खर्च आणि आगामी पावसाळ्यातील कमी पर्जन्यमानाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा, बियाणे आणि खते अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत व पक्के बिल घ्यावे. काळाबाजार होत असल्यास तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी केले आहे. तसेच, हवामान विभागाच्या अंदाजानुसारच पेरणीची वेळ निश्चित करावी, असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.

मशागतीच्या खर्चाचा मोठा ताण

खरीपपूर्व तयारीसाठी शेतकरी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत आहेत. सध्या शिवारात ट्रॅक्टरने नांगरणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, डिझेलचे दर आणि महागाईमुळे ट्रॅक्टरच्या भाड्याचे दर प्रतिएकर ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे मशागतीचा खर्च दुप्पट झाला असून, लहान व मध्यम शेतकऱ्यांपुढे पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा, असे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

कृषी मंडळांमध्ये मार्गदर्शन सुरू ^ हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे. यासाठी तालुक्यातील सर्वच कृषी मंडळांमध्ये मार्गदर्शन सुरू आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीची योग्य वेळ निश्चित करावी. येणारा पावसाळा कमी पर्जन्याचा येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पर्जन्यमान कमी असण्याची शक्यता हवामान अभ्यासक वर्तवत आहेत. नितीन कांबळे, तालुका कृषी अधिकारी, रेणापूर.

कृषी विभागाचे गावागावांत मार्गदर्शन पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदा खरीप लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. तालुक्यातील सर्वच कृषी मंडळांमध्ये शेतकऱ्यांना पेरणी आणि पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय आणि हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय पेरणी करू नये.

खते, बियाणे खरेदीत सावधानता हवी पेरणीसाठी बियाणे आणि खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. खरेदी करताना दुकानदाराकडून पक्क्या बिलाची पावती आवर्जून घ्यावी. कृत्रिम तुटवडा करून काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास, तक्रार करावी.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp